राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला होता. जवळपास 30 संघटनांनी हा संप पुकारला होता. अदानी कंपनीला वीज वितरण परवानगी देऊ नये, अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पहिल्याच दिवशी मध्यस्थी करत कर्मचाऱ्यांची मनधरणी केली. त्यानंतर हा संप मागे देखील घेण्यात आला. त्यामुळे राज्यावरील उर्जासंकट आता टळलं आहे.
#DevendraFadnavis #MSEBStrike #Mahavitaran #Electricity #Adani #PowerSupply #MSEDCL #Buldhana #Jalna #Privatisation #Dhule #Maharashtra #Strike #MSEB #AdaniPower